Buldhana News |बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या भावाचा आकस्मिक मृत्यू : साखरखेर्डा येथील दु:खद घटना..

भावाला आला हृदयविकाराचा तिव्र धक्का, बहिणीपाठोपाठ भावाच्याही मृत्‍यूने हळहळ, कुटुंबियांना धक्का
Buldhana News
Buldhana News |बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या भावाचा आकस्मिक मृत्यू : साखरखेर्डा येथील दु:खद घटना..
Published on
Updated on

बुलडाणा : वृध्द बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या भावाचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक मृत्यू झाल्याची दु:खद घटना साखरखेर्डा (ता.सिंदखेडराजा) येथे गुरूवार दि.१२ रोजी दुपारी घडली. बहिणीपाठोपाठ भावानेही जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

साखरखेर्डा येथील रहिवासी शशिकलाबाई रामकृष्ण सुरळकर (७८) यांचे ११मार्चच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. १२मार्च रोजी मयत शशिकला बाई यांच्या अंत्यविधीसाठी यवतमाळ येथून आलेले त्यांचे भाऊ तथा निवृत्त मंडल अधिकारी राम नामदेव ढोबळे (६८)हे स्थानिक स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार आटोपून अन्य नातेवाईकांसह दिवंगत बहिणीच्या घरी आले असता अचानक भोवळ येऊन खाली पडले.

आपल्या बहिणीच्या निधनामुळे शोकाकूल झालेल्या राम ढोबळे यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपस्थित नातेवाईकांनी त्यांना तात्काळ स्थानिक खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले , तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. बहिणीपाठोपाठ भावाचाही आकस्मिक मृत्यू झाल्याने सुरळकर व ढोबळे या दोन्ही परिवारांना मोठा धक्का बसला असून साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news