Buldhana Farmers Unique Protest pudhari
बुलढाणा

Buldhana Farmers Unique Protest: बुलढाण्यात शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; काजू बदाम घ्या खरं दुष्काळ जाहीर करा

पिकलं त्यावेळेस साठवणूकबंदी, निर्यातबंदी लादून शेतमालाचे भाव पाडले आता कर्तव्य पार पाडा

Anirudha Sankpal

Buldhana Farmers Drought Demand Unique Protest: बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने अनोख आंदोलन केलय. चिखली शहरामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांच्या नेतृत्वात भीक मागो आंदोलन करण्यात आलं. जवळपास दीड महिन्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचं तसं म्हणणं आहे.

प्रतिकात्मक आंदोलन

शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलना दरम्यान नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात पैसे, काजू आणि बदाम गोळा करण्यात आले. हे काजू बदाम आणि पैसे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अद्यापपर्यंत जिल्ह्यात आले नाही आणि नुसकानीचा कोणताही बांधावर जाऊन पंचनामा केला नाही.

शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर

गंभीर परिस्थिती असताना शेतकरी आत्महत्येच्या उंबरड्यावर ठेपलेला आहे. किती शेतकऱ्यांची आत्महत्या केल्यानंतर हे दुष्काळ जाहीर करणार आहे असा सवाल विचारला. तसेच नुस्ता कोरडा दुष्काळ जाहीर न करता शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये ठोस मदत द्यावी. संपूर्ण शेतकरी कर्जमुक्त केली पाहिजे.

म्हणून जबाबदारी सरकारचीच

आता ही जबाबदारी सरकारची आहे असं देखील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यानी सांगितलं. कारण ज्यावेळेस पिकलं त्यावेळेस यांनी साठवणूकबंदी, निर्यातबंदी लादून शेतमालाचे भाव पाडले. आज यांच हे कर्तव्य आहे की शेतकऱ्यांना ठोस मदत देऊन त्यांना धीर दिला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT