Shree Gajanan Maharaj Sansthan : शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांचा निधी  file photo
बुलढाणा

Shree Gajanan Maharaj Sansthan : शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांचा निधी

संस्थानच्या प्रतिनिधींनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 'मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

पुढारी वृत्तसेवा

1 crore 11 lakhs fund for drought victims from Gajanan Maharaj Sansthan of Shegaon

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा राज्यात यावर्षी अवर्षणामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानने पुढाकार घेतला असून आज दि.२७ सप्टेंबर रोजी संस्थानच्या प्रतिनिधींनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 'मुख्यमंत्री सहायता निधीस १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सून काळात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ अध्यात्मिक केंद्र नसून सामाजिक बांधिलकी जपणारी अग्रगण्य संस्था म्हणूनही ओळखले जाते. यापूर्वीही वर्ष २०१९ व २०२५ मध्ये राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संस्थानने सहायता निधी दिला होता.

याही वेळी राज्यातील दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आणि शासकीय पातळीवरील मदतकार्याला बळ देण्यासाठी श्री संस्थानने हा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार संस्थानकडून दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांचा निधी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT