Dnyanganga wildlife Sanctuary | ज्ञानगंगेत ‘धुरंधर-मोना’ची रंगली प्रेमभ्रमंती; जंगलात दोघांची जुळली जोडी!

अभयारण्यात सोडलेला नर वाघ ‘धुरंधर’ आणि वाघीण ‘मोना’ हे दोघेही एकत्रितपणे वनभ्रमण करताना आढळून आले
Dhurandhar  Mona Tiger Sighting
Dhurandhar Mona Tiger SightingPudhari
Published on
Updated on

Dhurandhar Mona Tiger Sighting

बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यात व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने उत्साहवर्धक घडामोड समोर आली आहे. अभयारण्यात सोडण्यात आलेला नर वाघ ‘धुरंधर’ आणि वाघीण ‘मोना’ हे दोघेही एकत्रितपणे वनभ्रमण करताना आढळून आले आहेत. वनविभागाच्या सातत्यपूर्ण निरीक्षण आणि मॉनिटरिंगदरम्यान त्यांच्या हालचाली निदर्शनास आल्या. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात राबविण्यात येत असलेल्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

बुलढाणा ते खामगावदरम्यान असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात जानेवारी २०२६ मध्ये ‘पीकेटीसीपी वन’ या नर वाघाला सोडण्यात आले होते. त्याला ‘धुरंधर’ असे नाव देण्यात आले आहे. अभयारण्यात व्याघ्र संवर्धनाला चालना मिळावी आणि वाघांच्या नैसर्गिक प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने जुलै महिन्यात ‘टीएस वन एफ’ या वाघिणीला अभयारण्यात सोडण्यात आले. तिला ‘मोना’ असे नाव देण्यात आले आहे.

Dhurandhar  Mona Tiger Sighting
Tiger Release | बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आता वाघाची डरकाळी : पहिल्यांदाच केली रेड्याची शिकार!

ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संवर्धन करण्यासोबतच नैसर्गिक प्रजननाला चालना देऊन भविष्यात वाघांची स्थिर आणि सक्षम संख्या निर्माण करण्यासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वन्यजीव विभागामार्फत वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

ट्रॅप कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, क्षेत्रीय निरीक्षण तसेच अन्य तांत्रिक साधनांच्या माध्यमातून ‘धुरंधर’ आणि ‘मोना’च्या हालचालींचे मॉनिटरिंग केले जात आहे. नियमित निरीक्षणादरम्यान हे दोन्ही वाघ सोबतीने भ्रमण करताना वनकर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांच्या एकत्रित वावरामुळे व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मिळाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

Dhurandhar  Mona Tiger Sighting
Dnyanganga Wildlife Sanctuary: ज्ञानगंगा अभयारण्यात रमली 'धुरंधर' - 'मोना' वाघांची जोडी; वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाला मोठे यश

या दोन्ही वाघांच्या हालचाली, अधिवासाचा वापर आणि नैसर्गिक वर्तन यांचा बारकाईने अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. वाघांची जोडी एकत्रितपणे फिरताना आढळल्याने त्यांच्या नैसर्गिक प्रजननाच्या दृष्टीनेही आशादायी वातावरण निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे वनक्षेत्र आहे. ‘धुरंधर’ आणि ‘मोना’चा एकत्रित वावर भविष्यात अभयारण्यात वाघांची संख्या नैसर्गिकरित्या वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्येही या घडामोडीमुळे उत्साहाचे वातावरण आहे.

Dhurandhar  Mona Tiger Sighting
Dnyanganga Wildlife Sanctuary | ज्ञानगंगा अभयारण्यातील 'धुरंधर' वाघाला मिळाली जोडीदारीण

ही व्याघ्र संवर्धन मोहीम प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, वनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, विभागीय वनाधिकारी यशवंत नागुलवार (अकोला), सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) दीपेश लोखंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) प्रकाश सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news