Samruddhi Expressway Robbery | समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून ३० टन कांद्यासह ट्रक पळविला

मेहकर-मालेगावदरम्यानची घटना; चार अज्ञात लुटारूंचे कृत्य
Buldhana Samruddhi Expressway Onion Truck Robbery
Buldhana Samruddhi Expressway Onion Truck RobberyPudhari
Published on: 
Updated on: 

Buldhana Samruddhi Expressway Onion Truck Robbery

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रक अडवून चालकाला बेदम मारहाण करत ३० टनांहून अधिक कांद्यासह तब्बल २५ लाख रुपये किमतीचा ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना मेहकर ते मालेगावदरम्यान डोणगावजवळ शुक्रवारी रात्री घडली. पांढऱ्या कारमधून आलेल्या चार अज्ञात लुटारूंनी हा प्रकार केल्याचे ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या लुटीत कांदा आणि ट्रक असा एकूण सुमारे ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.

या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. एपीआय कैलास गाडवे तपास करीत आहेत.

Buldhana Samruddhi Expressway Onion Truck Robbery
Buldhana News : ‘आम्ही शेतकऱ्यांचीच मुले, त्यांचे दु:ख व नुकसान समजू शकतो!’ कृषीमंत्री भरणे

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मिराज अहमद ऐजाज अहमद (२८, रा. थोन, जि. कौसंबी, उत्तर प्रदेश) हा जितेंद्र सहगल रोडलाईन्सच्या सीजी ०४ पीपी ९११३ क्रमांकाच्या ट्रकवर चालक म्हणून कार्यरत आहे. तो महाराष्ट्रातून नागपूरमार्गे झारखंडकडे ३० टन ५६० किलो कांदा घेऊन जात होता. या कांद्याची किंमत सुमारे ११ लाख ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास ट्रक समृद्धी महामार्गावर मेहकर-मालेगावदरम्यान डोणगावजवळ चॅनेल क्रमांक २६० ते २६९ दरम्यान आला असता पांढऱ्या रंगाच्या कारमधून चार अज्ञात व्यक्ती आल्या. त्यांनी जबरदस्तीने ट्रक अडविला. त्यानंतर चालक मिराज अहमद याला बेदम मारहाण करून ट्रकचा ताबा घेतला आणि कांद्यासह ट्रक पळवून नेला.

Buldhana Samruddhi Expressway Onion Truck Robbery
Buldhana News : दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये - पालकमंत्री मकरंद पाटील

या घटनेनंतर पीडित चालकाने शनिवारी सकाळी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चार लुटारूंविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर प्रवासी तसेच मालवाहू वाहनांना लक्ष्य करून लुटमारीच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून विविध उपाययोजना सुरू असतानाही अशा घटना घडत असल्याने वाहनचालक आणि वाहतूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लुटारूंच्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news