बुलढाणा,पुढारी वृत्तसेवा : देऊळगाव राजा शहरात गुरूवारी दुपारी विहीरीत कार कोसळल्याने मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह शोध घेण्या सुरू असताना मदतीसाठी धावून विहीरीत उडी मारणा-या युवकाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.पवन तोताराम पिंपळे (२२, देऊळगावराजा) असे त्यांचे नाव आहे. (Buldhana)
दिवाळीच्या सुट्या असल्याने रामनगर निवासी शिक्षक अमोल मुरकुटे हे त्यांची पत्नी स्वाती (३५) यांना कार चालवणे शिकवत असताना नियंत्रण सुटून कार रस्त्यालगतच्या एका विहीरीत पडून पाण्यात बुडाली. या कारमध्ये सोबत सिद्धी मुरकुटे (११) ही मुलगीही बसलेली होती. दुर्घटनेत स्वाती व सिद्धी या मायलेकींचा मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह काढण्यासाठी पवन पिंपळे या युवकाने विहीरीत उडी घेतली. दुर्दैवाने त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Buldhana)
हेही वाचा