विदर्भ

बुलडाणा : बोलेरो-ट्रकच्या भीषण अपघातात ५ भाविक ठार

अविनाश सुतार

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : एकादशीच्या निमित्ताने शेगावकडे संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असलेल्या भाविकांची बोलेरो गाडी व समोरून आलेल्या ट्रकची जबर धडक झाली. या भीषण अपघात ५ भाविक जागीच ठार झाले. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना-चिखली मार्गावर देऊळगावराजा वळण रस्त्यावर आज (सोमवार) पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

जालना जिल्ह्यातील रोहणवाडी व कारखेडा येथील भाविक बोलेरे गाडीने भल्या पहाटे शेगावकडे जात होते. या वाहनावर काळाने अकस्मात घाला घातला. बोलेरो वाहनातील अर्जून जयवंत पाडपुख ( वय ६०), कांताबाई अर्जून पाडपुख (वय ५५), श्रीमंत अर्जून पाडपुख (वय ४५) श्रीमंत पाडपुख,आकाश गरीबदास लिहणार (वय २७), कपील अर्जून गायकवाड (वय ३२) हे ५ जण जागीच ठार झाले.

तर आम्रपाली विठ्ठल पाडपुख (वय ३५), मिनाबाई पाडपुख (वय ३५), अशोक लिहणार (वय ४०), तुकाराम बाबूराव खांडेभराड (वय ४०), मिराबाई बाळराज (वय ४०), बाबूराव श्रीपत कापसे (वय ५०), परमेश्वर कचरूबा बाळराज (वय ३९) हे ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : आप हा देशातील मोठा विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो का? राजकीय विश्लेषक संतोष कुलकर्णी

SCROLL FOR NEXT