विदर्भ

Bhandara : कॉंग्रेसचा बुरुज कोसळला; भंडारा बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : अत्यंत अटीतटीची समजल्या जाणाऱ्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस समर्थित गटातील संचालकाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या गळ्यात सभापतीची माळ पडली. तर उपसभापतीपद शिवसेना शिंदे गटाला मिळाले. ऐनवेळी झालेल्या भाजपप्रवेशामुळे भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील १५ वर्षांपासूनचा कॉंग्रेसचा बुरूज भाजपने उद्वस्त केला. सभापतीपदावर भाजपमध्ये गेलेले विवेक नखाते यांची निवड झाली तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते यांची निवड झाली.

भंडारा बाजार समितीत १८ पैकी ९ संचालक काँग्रेस समर्थित तर राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाचे सहा संचालक तसेच तीन अपक्ष निवडून आले होते. निवडून आलेल्या तिनही अपक्षांवर राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाने दावा ठोकल्याने दोन्ही गटाचे संख्याबळ ९ विरुद्ध ९ असे झाले होते. बहुमतासाठी एका संचालकाच्या पाठिंब्याची गरज होती. त्यासाठी दोन्ही गटाकडून प्रचंड आटापिटा सुरू होता. दरम्यान, गेल्या १५ वर्षांपासून सभापती असलेले कॉंग्रेसचे रामलाल चौधरी यांच्या गटातील विवेक नखाते यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे रामलाल चौधरी गटाकडे ८ संचालक आणि राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गटाकडे १० संचालक होते.

आज सभापती आणि उपसभापतीपदाकरीता निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी कॉंग्रेसच्या गटातून रामलाल चौधरी तर राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाकडून विवेक नखाते तसेच उपसभापती पदासाठी कॉंग्रेस गटातून नितीन कडव आणि राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाकडून नामदेव निंबार्ते रिंगणात होते. सभापतीपदाच्या निवडणुकीत विवेक नखाते यांना १० मते तर रामलाल चौधरी यांना ८ मते मिळाली. तर उपसभापती निवडणुकीतही नामदेव निंबार्ते यांना १० तर नितीन कडव यांना ८ मते मिळाली. विवेक नखाते आणि नामदेव निंबार्ते यांना विजयी घोषित करण्यात आले.

हा विजय कोणत्याही पक्षाचा नसून शेतकºयांच्या हिताकरिता झालेल्या लढाईचा विजय आहे. गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचे एकछत्री राज असल्याने बाजार समितीचा विकास थांबला होता. त्यामुळे एकत्र येऊन शेतकºयांच्या हितासाठी सत्ताबदल करणे गरजेचे होते.
-आ. नरेंद्र भोंडेकर, भंडारा-पवनी विधानसभा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT