भाजप नेत्याच्या सांगण्यावरून शिवाजी विद्यापीठाची डी. लिट मिळाली नाही: अण्णासाहेब डांगे | पुढारी

भाजप नेत्याच्या सांगण्यावरून शिवाजी विद्यापीठाची डी. लिट मिळाली नाही: अण्णासाहेब डांगे

विटा: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी यापूर्वीच मला मिळाली असती. परंतु भाजपमधून मी बहिष्कृत असल्याने अखेरच्या क्षणी एका भाजप नेत्याच्या सांगण्यावरूनच माझे नाव वगळले गेले, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी केला.

अण्णासाहेब डांगे यांना पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लीट पदवी देऊन सन्मान केला. याबद्दल विटा येथे पं. दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सौ. लीलाताई देशचौगुले प्राथमिक विद्यामंदिर शाळेत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर, भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या नीताताई केळकर, प्रकाश बिरजे, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, अॅड. विनोद गोसावी, अनिल बाबर, संतोष बिडकर, विनय पेटकर, शिवप्रसाद शेंडे, किशोर डोंबे आदी उपस्थित होते.

यावेळी अण्णासाहेब डांगे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठात मला डी. लिट पदवी देण्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल गेली. त्यावेळी तो प्रस्ताव अखेरच्या टप्प्यात मंजुरीसाठी असताना एका भाजप नेत्याने हस्तक्षेप केला. आणि केवळ मी त्या पक्षात नाही म्हणून माझा प्रस्ताव नाकारण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

आमदार बाबर म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री हा अण्णासाहेबांचा जीवन प्रवास आपण जवळून पाहिला आहे. त्यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाने आमदारकी गाजवली.

हेही वाचा 

Back to top button