

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे अशोक ठेंगल यांची, तर काँग्रेसचे मदन इंगोले – पाटील यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. या निवडीसाठी आज (दि.२२) विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे व माजी आमदार भाऊराव पाटील आदी उपस्थित होते.
सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिलला पार पडली. यामध्ये भाजप, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसने एकत्र येऊन पॅनल लढवले. यामध्ये त्यांचा १८ पैकी एकूण १३ जागेवर विजय झाला. मात्र सभापती पदाची निवड प्रक्रिया ही हिंगोलीच्या बाजार समितीवर अवलंबून होती. दोन्ही ठिकाणी याच तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवल्यामुळे त्यांच्यात या बाजार समितीच्या सभापती पदासाठी करार झाला होता. त्यामध्ये हिंगोलीत शिवसेनेला तर सेनगाव येथे भाजपचा सभापती करण्याचा निर्णय या तिन्ही विरोधी पक्षांनी घेतला होता.
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, रुपालीताई पाटील गोरेगावकर, सुनिल पाटील गोरेगावकर, द्वारकदासजी सारडा, रणजीत पाटील, संतोष देवकर, पिंटू गुजर, वैभव देशमुख, अंकुश तिडके, भिकाजी अवचार, पुरुषोत्तम गडदे, संजय देशमुख, भास्कर पाटील, सावके मदन, चंद्रकांत हराळ, बोराडे संजीवनी, छाया पोले, विजय तोष्णीवाल, प्रकाश बिडकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा