Accident News  Pudhari
भंडारा

Bhandara Accident | वाढदिवसाच्या तीन दिवसांआधीच काळाचा घाला: भरधाव कारच्या धडकेत तरुण ठार

तुमसरजवळील खापा-खरबी महामार्गावर अपघात, दोन मित्र गंभीर जखमी:

पुढारी वृत्तसेवा

Khapa-Kharbi highway accident
भंडारा: तुमसरजवळील खापा-खरबी राष्ट्रीय महामार्गावर धुलीवंदनाच्या दिवशी ३ मार्चरोजी  दुपारी एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांनंतर मृत युवकाचा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने खरबी गावावर शोककळा पसरली आहे.

प्रशांत पुरूषोत्तम कांबळे (वय २९, रा.खरबी) असे मृत युवकाचे नाव आहे. विकास अशोक गोमासे (वय २८), भुषण गजानन सिंगनजुडे (वय २८, रा.खरबी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

प्रशांत  कांबळे  हा ३ मार्चरोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने गावाकडे परत येत असताना  खरबी शिवारातील  ढाब्यासमोर  भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले विकास अशोक गोमासे व भूषण गजानन सिगंनजुडे हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले.

हा अपघात खापा-खरबी शिवारातील एका ढाब्यासमोर उभा असलेल्या ट्रकमुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आणि समोरून येणाºया कारचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

संतप्त ग्रामस्थ आक्रमक

घटनेची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी संतप्त नागरिक आक्रमक होत महामार्गावर ठिय्या मांडला होता. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिक नमते झाले व  महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT