भंडारा : पुढारी वृत्तसेवा : नांदेड आणि श्री छत्रपती संभाजीनगरात रुग्णांचे एका मागोमाग एक मृत्यू होत असताना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना औषध नाकारण्यात आला आहे. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील पालांदूर ग्रामीण रुग्णालयात घडला आहे. रुग्णांना मनस्ताप झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या विरोधात त्यांनी दारावरच ठिय्या आंदोलन केले.
संबधित बातम्या
सध्या विषाणूजन्य आजाराची साथ सुरू आहे. दररोज रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. पालांदूर येथील खासगी व ग्रामीण रुग्णालयात सुद्धा रुग्णांची संख्या मोठी आहे. ज्येष्ठांसह शाळकरी विद्यार्थी सुद्धा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले असता कर्मचाऱ्याच्या कमतरतेसह औषधांचा सुद्धा तुटवडा अनुभवास आला आहे.
खासगीत औषध उपचारात पैसे अधिक लागत असल्याने सरकारी दवाखान्यात हक्काने उपचार घेणाऱ्याची संख्या मोठी आहे. मात्र, सरकारी दवाखान्यात अजूनही व्यवस्था ऑक्सिजनवरच दिसत आहे. खोकल्याचे औषध गेल्या चार-पाच दिवसापासून नसल्याचे समजले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याने ठिय्या आंदोलन केले. कर्तव्यावरील डॉक्टर श्रीरामे यांनी रुग्णांची समस्या जाणून आजच औषधासाठी भंडारा येथे मागणी केली असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.
हेही वाचा :