भंडारा

भंडारा : तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

दिनेश चोरगे

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (दि.४) तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर माऊली पेट्रोल पंपसमोर घडला. या अपघातात अतुल गुर्वे (वय ३०, रा. शहर वॉर्ड तुमसर ) याचा मृत्यू झाला असून राम गुर्वे ( वय ३३, रा. नवरगाव ) हा गंभीर जखमी आहे. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, अतुल गुर्वे व राम गुर्वे हे दोघे दुचाकीवरून सिहोराकडे जात होते. तुमसर-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीसमोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटले व भरधाव दुचाकीची ट्रकला धडक बसली. अपघातादरम्यान दुचाकीचे हँडल ट्रकच्या मागच्या भागात फसले. त्यामुळे दोघांसह दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. त्यात अतुल गुर्वे व राम गुर्वे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोघांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अतुल गुर्वे याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT