हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू | पुढारी

हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीतील सदर बाजार येथील कुरेश नगर भागात आज (दि.२ एप्रिल) भीषण दुर्घटना घडली. एका घराला लागलेल्या  आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले. दोन्ही मुलींनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. त्यानंतर दोघांचाही तेथेच गुदमरून मृत्यू झाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्‍या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसी डक्टमधून धूर घरात शिरला. टीमने गॅस मास्क घालून घरात प्रवेश केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून अनाया (१२) आणि गुलाश्ना (१२) या दोन मुलींना बाहेर काढले. त्‍यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. दोघींचा तेथे उचापारापूर्वीच मृत्यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. या दुर्घटनेचे कारण अद्‍याप स्पष्ट झालेले नाही.

Back to top button