एसटीखाली चिरडून बाप-लेकाचा करूण अंत, पोलीस बंदोबस्तात निघाली अंत्‍ययात्रा file photo
भंडारा

एसटीखाली चिरडून बाप-लेकाचा करूण अंत, पोलीस बंदोबस्तात निघाली अंत्‍ययात्रा

नागरिकांचा आक्रोश, शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

पुढारी वृत्तसेवा

Father and Son Meet Tragic End After Being Run Over by ST Bus; Funeral Procession Held Under Police Protection

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

भंडारा येथील एसटी डेपोमध्ये एसटी बसच्या धडकेत बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात जनाक्रोश उफाळून आला. डेपोसमोर नागरिकांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज शनिवारी, कडेकोट पोलिस बंदोबस्तात दोघांचीही अंत्ययात्रा काढण्यात आली. अश्रृपूर्ण वातावरणात नागरिकांनी त्यांना निरोप दिला.

शुक्रवार, २४ एप्रिल रोजी संध्याकाळी, भंडारा येथील चांदनी चौक, कुंभार टोली रहिवासी रोहित खेडकर (४०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर (३) यांचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या बसमुळे रोहितला धक्का बसला. रोहित आणि रौनक बसच्या चाकाखाली चिरडले गेले. या घटनेनंतर वडील आणि मुलगा जखमी झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

एसटी डेपोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले नाही. त्यांनी या घटनेबद्दल कुणालाही कळविलेही नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. जेव्हा त्यांचे कुटुंबीय आले, तेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर कुटुंबीय आणि नागरिक अधिकच संतप्त झाले. रात्री उशिरापर्यंत संतप्त कुटुंबीयांनी डेपोमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करण्यात आली. वेळीच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री खासदार डॉ. प्रशांत पाडोळे, नगरसेवक भगवान बावनकर आणि अनेकांनी डेपो अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होती. कुटुंबीयांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर तणाव निवळला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. आज शनिवारी सकाळी वडील रोहित आणि मुलगा रौनक यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तणावपूर्ण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शेकडो पोलिसांची कुमक तैनात होती. भंडारा पोलिस मुख्यालय आणि विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते.

पत्नीला मिळणार नोकरी

वडील आणि मुलाच्या मृत्यूमुळे खेडकर कुटुंब धक्क्यात आहेत. या दु:खाच्या काळात रोहितच्या पत्नीला आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नोकरी आणि आर्थिक मदतीची मागणी अधिकाऱ्यांकडे केली होती. प्रदिर्घ चर्चेनंतर एसटी विभागाने पत्नीला काही दिवसांसाठी तात्पुरती नोकरी आणि नंतर कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच २० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT