भंडारा

भंडारा : दोघांकडून सीआरपीएफ जवानाला मारहाण

करण शिंदे

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : दुचाकी अपघात प्रकरणात झालेली नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने, सीआरपीएफ सैनिकास भोजापूर-खोकरला येथे भररस्त्यावर खोकरला ग्रा.पं.च्या महिला सदस्याच्या मुलाने आणि पतीने सीआरपीएफ जवानास शिवीगाळ करुन जबर मारहाण केल्याची घटना घडली. या अपघात प्रकरणी भंडारा शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गंगानगर येथील विवेक नंदनवार हे सीआरपीएफ जवान असून श्रीनगर येथे ते कर्तव्यावर आहेत. नुकतेच ते काही दिवसांच्या सुट्टीवर आले आहेत. मंगळवारी (दि.11) भंडारा शहरात कामानिमित्ताने ते दुचाकीने गेले होते. कामे आटोपून परत जाताना भोजापूर-खोकरला खोकरला ग्रा.पं.सदस्या मंगला क्षीरसागर यांचा मुलगा जयेश शिरसागर हा दुचाकीने येत होता. तेव्हा त्याने जवानाच्या गाडीला त्याने धडक दिली.

त्यानंतर नंदनवार आणि जयेश यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर जयेशने आई-वडील आणि अन्य सहकाऱ्यांना अपघात घडल्याबाबतचा फोन केला. माहिती मिळताच मुलाचे आई-वडील घटनास्थळी पोहचले. दरम्यान कुठलीही शहानिशा न करता सैनिक विवेक नंदनवार यांना शिविगाळ करत प्रसंगी वडिल आणि मुलगा त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान कोणतीही शहानीशा न करता कोणत्या कारणाने अपघात घडला व कोणाची चुक आहे, याबाबत कुठलीही माहिती न घेता जवानास मारहाण केल्याने, सदर अपघात प्रकरण घेवून, भंडारा पोलिस स्टेशन येथे दोघेही दुचाकी चालक पोहचले. तक्रारीची दखल घेत एकमेकांविरुध्द भंडारा पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT