प्रोटिन्स लिमिटेड उद्योग बंद; 250 कामगारांवर उपासमारीची पाळी

प्रोटिन्स लिमिटेड उद्योग बंद; 250 कामगारांवर उपासमारीची पाळी

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर येथील बामणी प्रोटिन्स लिमिटेड कंपनी चुकीच्या व्यवस्थापनामुळे उद्योग बंद पडली आहे. यामुळे तब्बल 250 कामगारांनावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात भारतीय केमिकल वर्क्स युनियनने (दि.20) मे पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. बुधवारी (दि.12) 23 दिवसांनी कामगारांच्या या धरणे आंदोलनात त्यांचे कुटुंब सहभागी झाले, कंपनी व्यवस्थापनाने आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कामगारांच्या कुटुंबीयाने केली आहे.

चंद्रपूर शहरालगतच्या बल्लारपूर येथील बामणीमध्ये वर्ष 1998 पासून बामणी प्रोटिन्स हा उद्योग सुरु झाला होता. या कंपनीत तब्बल 250 कामगार कार्यरत आहेत. 2024 मध्ये राजेश बेले यांनी बामणी प्रोटिन्स उद्योग हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती.

त्या तक्रारीवरून प्रदूषण नियामक मंडळाने लॉकआऊट कारवाई करीत रीतसर प्रदूषण बाबतीत उपाययोजना करीत उद्योग पूर्वरत सुरु करा असे निर्देश 13 मार्च रोजी कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. मात्र कंपनीने प्रदूषण नियामक मंडळाच्या निर्देशाचे पालन केले नाही. तसेच नफ्यात असलेला उद्योग त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कंपनीने कामगार संघटनांना कसलीही पूर्वसूचना न देता 19 मे 2024 ला कंपनीच्या गेटला टाळे लावले.

उद्योगात मान्यता प्राप्त कामगार संघटना असताना सुद्धा व्यवस्थापनाने कसलीही चर्चा केली नाही, त्यामुळे 20 मे पासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्यवस्थापनाशी बैठक घेतली. मात्र, व्यवस्थापनाही भूमिका उद्योग सुरु कारण्याबाबत सकारात्मक दिसून आली नाही.

त्यामुळे 12 जूनपासून कामगारांसह त्यांचे कुटुंब महिला आणि मुले या लढ्यात सामील झाले आहेत. कामगारांच्या कुटुंबाला आता मुलांच्या भविष्याची चिंता होऊ लागली आहे. व्यवस्थापनाने जुलै महिन्यापर्यंत कामगाराना वेतन देण्याचं ठरविले मात्र त्यांनतर काय होणार? हा प्रश्न कामगारांच्या पुढे आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news