भंडारा

Bhandara News : सरपंचाची बनावट सही करून उचलले ३१ लाख रुपये; देव्हाडाचे ग्रामसेवक निलंबित

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देव्हाडा/बु येथील ग्रामसेवक राकेश वैद्य यांनी सरपंचांची बनावट सही करून ३१ लाख ८९ हजार ६०० रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात ग्रामसेवक राकेश वैद्य यांना निलंबित करण्यात आले आहे. Bhandara News

देव्हाडा/बु. येथे सन २०२१ मध्ये ग्रामसेवक राकेश वैद्य हे रूजू झाल्यापासून हा प्रकार सुरू झाला. सरपंच व सदस्य यांच्यामध्ये समन्वय नसल्याने विकासकामे करण्यास अडचण निर्माण होत होती. याचाच फायदा घेत ग्रामसेवक राकेश वैद्य यांनी पहिली बनावट सही करून सामान्य फंडातून ५ लाख ४९ हजार उचल केले. ही बाब ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कळली नसल्याने वैद्य यांची मजल वाढली. त्यानंतर सामान्य फंडाचे तब्बल १२ धनादेश व पाणी पुरवठा विभागाचा एक धनादेश, अमानत फंडाचा एक धनादेश व नवबौद्ध घटकातील वस्तीचा विकास करणे फंडाचा एक धनादेश इतक्या धनादेशाद्वारे ३१ लाख ८९ हजार ६०० रुपये उचल केले. Bhandara News

साईबाबा मंदिर आवार भिंतीच्या कामाचे देयक पुरवठाधारकास देण्यात आले, त्यांनी धनादेश बँकेत लावला असता धनादेश बाऊन्स झाला आणि प्रकरण उजेडात आले. याबाबत सरपंच व उपसरपंच व सदस्य यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले यांनी चौकशी केली असता वैद्य यांनी आरोप मान्य केले. त्यानुसार त्यांनी लेखी लिहून दिले तसेच दुर्योधन बोंद्रे व इतर चार सदस्य यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी मोहाडी व आयुक्त यांना लेखी तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ राकेश वैद्य यांना निलंबित केले. करडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र, ग्रामसेवक वैद्य यांनी संपूर्ण काढलेली रक्कम ग्रामपंचायतमध्ये विविध खात्यांमध्ये जमा केली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT