file photo 
विदर्भ

भंडारा : ट्रक चालकाचा गळा आवळून खून

मोहन कारंडे

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील येनोळा येथील राईस मिलवर धानाचा कोंढा ट्रकमध्ये भरून नेण्याकरिता आलेल्या ट्रक चालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सत्यशील नीलकंठ मेश्राम, रा. वडसा असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद पवनी पोलिसांत झाली आहे.

अधिक माहिती अशी की, ५ डिसेंबर रोजी विठ्ठल राईस मिल येनोळा येथे सत्यशील मेश्राम हा धानाचा कोंढा भरण्याकरिता ट्रक (एमएच ३६ – ०७१०) घेवून गेला होता. रात्रीची वेळ असल्यामुळे ट्रक भरून मिळाला नसल्याने राईस मिलच्या आवारातच ट्रक उभा करून तो झोपला होता. दुसऱ्या दिवशी ट्रक मालकाने सत्यशील याला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे ट्रक मालकाने पवनी येथील धान्य व्यापाऱ्याला सत्यशीलजवळ जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

व्यापाऱ्याला सत्यशील हा ट्रकमध्येच बेशुध्द अवस्थेत आढळून आला. तात्काळ त्याला उपचाराकरीता भंडारा येथे दाखल करण्यात आले होते; पण उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सत्यशील याचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT