विदर्भ

काँग्रेस नेते संतोषसिंग रावत यांच्यावर गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न

अमृता चौगुले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा  :  काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर अज्ञात इसमाने बुरखाधाऱ्याने चारचाकी वाहनातून गोळी झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी त्यांच्या हाताला चाटून गेल्याने ते जखमी झाले. ही घटना काल गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे घडली.

काँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर काल गुरुवारी रात्री पावणे दहावाजताच्या सुमारास मुल शहरात चारचाकी वाहनातून आलेल्या एका बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी हाताला चाटून गेल्याने रावत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या घटनेने मूल शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर संतोषसिंग रावत यांनी थेट मुल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. यानंतर मुल पोलिसांनी मुल शहरात सर्वत्र नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. पोलिसांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मूल शाखेतील सीसीटीव्ही कॅमेराची चौकशी केली असता हल्लेखोर मारुती स्विफ्ट डिझायर कारने घटनास्थळी आले होते, असे निदर्शनास आले आहे.

या घटनेमुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. माजी मंत्री तथा आमदार विजय वड्डेटिवार यांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारून्याचा इशारा दिला आहे. रात्रीच्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT