अमरावती

अमरावती : पोहरा घाटमार्गावर दोन कारचा भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

करण शिंदे

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पोहरा घाटमार्गावर वाघामाता मंदिराजवळ दोन चारचाकी वाहनांचा बुधवारी (दि.29) भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर, एका महिलेसह तीन जण जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, आकोट येथील योगेश गावंडे, शुभम गावंडे, अक्षय विठ्ठल गावंडे हे तीनही चुलत भाऊ यवतमाळ येथे बियाणे आणण्यासाठी आपली कार क्रमांक एमएच 37 व्ही 1176 मधून जात होते. दरम्यान अमरावती वरून पोहरा मार्गे यवतमाळला जाताना राँग साईडने येणाऱ्या चारचाकी वाहन एमएच 14 केजे 1484 या क्रमांकाच्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश गावंडे यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन भाऊ जखमी आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले. राँग साईडने येणाऱ्या वाहनातील महिला जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच मार्गावरील अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT