अमरावती

Amravati News: मसानगंज परिसरातून क्रिकेट सट्टेबाजांना अटक

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: क्रिकेट विश्वचषकातील भारत विरूध्द आस्ट्रेलिया या खेळाच्या अंतिम सामान्यावर सट्टा लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या सीआययू पथकाने मसानगंज परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. परतवाडा येथील रहिवासी संजू उदापूरकर व मसानगंज येथील रहिवासी नितीन गोयल असे अटक केलेल्या दोन्ही सट्टेबाजांची नावे आहेत. Amravati News

विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबररोजी खेळविण्यात आला. सदर सामना अहमदाबाद येथे होता. या सामन्यासाठी शहरात लाखो रुपयांचा सट्टा लावण्यात आला होता. तथा परतवाडा येथील संजू उदापूरकर यांनी आपला पंटर असलेल्या नितीन गोयल सोबत मसानगंज येथे क्रिकेट सट्टा चालवित असल्याची भनक सीआययू पथकाला लागताच त्यांनी सापळा रचून मसानगंज येथून दोन्ही आरोपींना अटक केली. Amravati News

संजू उदापूरकर व नितीन गोयल यांच्यापासून पोलिसांनी पाच मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करून अटक केली आहे. सदरची कारवाई मसानगंज परिसरात करण्यात आली. नितीन गोयल याचे स्वमालकीचे इतवारा बाजार येथे बालाजी मंदिराजवळ मोबाईलचे दुकान आहे. दरम्यान, जप्त केलेल्या मोबाईलमधून क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT