बडनेरा – नाशिक, अमरावती- पुणे ३६ उत्सव विशेष ट्रेन चालवणार | पुढारी

बडनेरा - नाशिक, अमरावती- पुणे ३६ उत्सव विशेष ट्रेन चालवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; येत्या काळात उत्सव मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन बडनेरा – नाशिक आणि अमरावती – पुणे दरम्यान उत्सव विशेष मेमू ट्रेन चालवण्यात येणार आहे. दसऱ्यानंतर दिवाळी सणाला प्रारंभ होणार असल्याने नागरिकांची रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. या दृष्टीने दृष्टीने मध्य रेल्वेने नाशिक ते बडनेरा अमरावती ते पुणे दरम्यान विशेष गाड्या मेमू ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बडनेरा – नाशिक मेमू ही गाडी क्रमांक 01211 विशेष मेमू बडनेरा येथून 6 ते 19 नोव्हेंबर दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01212 विशेष मेमू नाशिक येथून पर्यंत दररोज ०९.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. १४ अप आणि १४ डाऊन एकूण २८ फेऱ्या मारणार आहे बडनेरा, मुर्तजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक येथे थांबणार आहे.

अमरावती – पुणे मेमू ही गाडी 5 नोव्हेंबर 2023 रोजी अमरावती येथून गाडी क्रमांक 01209 सुटेल तर 19 नोव्हेंबर पर्यंत ही मेमो ट्रेन सुरू राहणार आहे. विशेष मेमू पर्यंत दर रविवारी आणि बुधवारी १२.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01210 विशेष मेमू पुणे येथून ०६नोव्हेंबर ते २०. नोव्हेंबर पर्यंत दर गुरुवार आणि सोमवारी ०६.३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल. या काळात ४ अप आणि ४ डाउन एकूण ८ फेऱ्या मारणार आहे. ही गाडी अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे थाबेल.

Back to top button