ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 
अमरावती

अमरावती : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना अमरावतीतील एमआयडीसी टी पॉइंटवर मंगळवारी (दि.८) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. मृत तरूण हा धारणी येथील रहिवासी आहे. मात्र त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. स्वप्नील नंदलाल गाडगे (वय २५, धारणी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेळघाटातील धारणी व चिखलदरा येथील अनेक तरुण रोजगाराच्या शोधात अमरावती शहरात येतात. धारणी आणि चिखलदरा येथील अनेक तरुण एमआयडीसीमध्ये काम करतात. मंगळवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान बडनेरा मिनी बायपासच्या एमआयडीसी टी पॉइंटवर भरधाव ट्रकने (क्र. एमएच ४६/एएफ ०५९३) आणि दुचाकीला पाठीमागून जोराची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला स्वप्नील गाडगे हा तरूण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणाची माहिती तात्काळ राजापेठ पोलिसांना देण्यात आली. राजापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुनित कुलट, सहायक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर, वाहतूक पोलिस विभागाच्या पीआय रिता उईके घटनास्थळी पोहोचले. जखमी स्वप्नील गाडगे याला तत्काळ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करत ट्रक जप्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT