अमरावती

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पडला मोठा जीवघेणा खड्डा, वाहतूक वळविली

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अपघातांच्या मालिकांसाठी कुप्रसिद्ध झालेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे.  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोहगाव येथील पुलावर हा खड्डा पडला आहे.  काही शेतकरी या मार्गाने जात असताना त्यांना पुलावरील रस्त्याचे काँक्रीट खाली कोसळल्याचे दिसून आले. सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. Samruddhi Mahamarg

लोहगावनजीक  एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. पुलावरच भगदाड पडल्याने येथील काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे. या उड्डाणपुलावर भगदाड पडल्याने खड्ड्यातील लोखंडी सळ्या स्पष्टपणे दिसून येत आहेत. या खड्ड्याची माहिती प्रशासनाला देण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या वाहनांचा या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डा पडलेल्या ठिकाणी तात्पुरते कठडे उभारले असून वाहतूक वळविण्यात आली आहे. Samruddhi Mahamarg

विशेष म्हणजे उद्घाटनापासून समृद्धी महामार्ग कायम चर्चेत राहिला आहे. येथील अपघातांची मालिका अद्यापही थांबलेली नाही. त्यात आता समृद्धी महामार्गावरच खड्डा पडल्यामुळे येथील बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी लांबीचा आहे. दरम्यान, आता महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या ४ मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT