अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथून अस्थी विसर्जन करून परत येत असताना पिकअप वाहनाला झालेल्या अपघातात 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 29) तिवसा ते कुऱ्हा मार्गावर शेंदुर्जना घाट पुलावजवळ दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान झाला.