विदर्भ

अमरावती : महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, युवक ठार

backup backup
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ३) सायंकाळी  रॅलीश हॉटेल नजीक घडली. घटनेत अभिषेक श्रीकृष्ण हिंगणकर (वय २४, रा गोपाल नगर) हा युवक जागीच ठार झाला. अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता.
घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकच्या चाकात अडकलेला मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अभिषेक हिंगणकर आपल्या दुचाकीने अमरावतीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये अभिषेक जागीच ठार झाला. अपघातानंतर काहीवेळ त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती तर वाहतूक सुध्दा खोळंबली होती.
पो.नि. रेश्मा कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच वाहतूक सुरळीत करून अभिषेक हिंगणकर याचा मृतदेह काढून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. अभिषेक हिंगणकर यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे हे करत आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT