अकोला

अकोला : जितापूर येथे अस्वलाच्या हल्ल्यात वन मजुराचा मृत्यू

अविनाश सुतार
अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोट रेंजमधील धोंडा आखर वर्तुळ क्षेत्रातील पूर्व जितापूर बीट परिसरात सोमवारी सकाळी ८ च्या  सुमारास गस्त घालत असताना वनमजूरावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ५९ वर्षीय वनमजूर रसुल रुस्तम गीरे यांचा मृत्यू झाला.
गस्तीवर असताना त्यांच्यासोबत वनरक्षक सींग, वनमजूर सुरेंद्र सोलकर हेही होते. त्यांनी अस्वलाच्या हल्ल्यास प्रतिउत्तर दिले. मात्र, तो पर्यंत अस्वलाने वनमजुरास गंभीर जखमी केले होते. परिसरातील नागरिकांच्या मदतीने मारे मांना अकोट येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT