विदर्भ

अकोलाः दारू पितो म्हणून अल्पवयीन मुलाकडून वडिलाचा निर्घृण खून

अविनाश सुतार

अकोलाः पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलानेच वडिलांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याचा प्रकार अकोला शहरातील मानव शोरुम जवळ आज (दि. १४) घडला. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. सुनील शिकारी असे खून झालेल्याचे नाव आहे. या घटनेमुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. दारु पिण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळील मानव शोरूम समोर सुनील शिकारी कुटुंबासोबत राहतात. झाडू तयार करुन विक्री करुन हे कुटुंबीय आपला चरितार्थ चालवितात. मृत सुनील शिकारी याला दारुचे व्यसन होते. याचाच राग धरुन अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे, ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT