अकोला : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल | पुढारी

अकोला : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी १९ वर्षीय तरुणाचे पिंजर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील एका अल्पवयीन मुलीशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमप्रकरण सुरू झाले तेव्हा पीडिता केवळ १२ वर्षांची होती. पीडितेच्या आई आणि वडिलांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला होता, तेव्हा आई आणि मुलगी दोघेही मुंबईत राहत होते.

लॉकडाऊन संपताच ती गावात आली. तेथून आई व मुलगी दोघेही अकोला शहरात एका दुकानात काम करण्यासाठी अकोल्यात राहिले. दरम्यान, तरुण आणि अल्पवयीन यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांमधील प्रस्थापित नातेसंबंधामुळे ती गरोदर राहिली. मुलीला वारंवार पोटदुखीसाठी तज्ज्ञांकडून तपासणी केली असता ही बाब उघडकीस आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपी युवकास अटक करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा;

Back to top button