अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी

अकोला :  ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी

अकाेला; पुढारी वृत्तसेवा : जीवे मारण्याच्या धमकी देणारे दोन फोन आज (दि. ५) सकाळी आल्‍याचे माहिती बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आज माध्‍यमांशी बोलताना दिली. धमकी देणाऱ्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेऊन धमकी दिल्याचेही त्‍यांनी सांगितले. या संदर्भातील माहिती देणारा एक व्हिडीओ साेशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्‍यान, काही दिवसांपूर्वी देशमुखांना 'एसीबी' चौकशीला समोर जावं लागले होते.

 नितीन देशमुख हे ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यांना नारायण राणे व नितेश राणे यांचे नाव घेवून धमकी दिली असल्याची माहिती समाेर आली आहे. आतापर्यंत नारायण राणे यांनी मुंबईत मारून अनेकांना समुद्रात फेकून दिलं, असेही धमकी देणाऱ्यांनी म्हटल्याचे देशमुख यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले. मुंबईला या तुमचाही समाचार घेऊ, असे धमकी देणार्‍याने सांगितले.

धमकी देणार्‍यांचे आव्‍हान मी स्‍वीकारले आहे. मी मंगळवारी मुंबईला जाणार आहे. ज्या लोकांचे आता पर्यंत खून झाले, ज्यांचा ठावठिकाणा लागला नाही अशांचा ३०२ चा गुन्हा नारायण राणे यांच्यावर लावण्यात यावा, अशी विनंती शासनाकडे केली आहे, असेही यावेळी देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news