चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : माजरी वरून भद्रावतीकडे जाणा-या एका दुचाकीस्वाराला समोरुन येणा-या कारने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तसेच दोन लहान मुलींसह पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. ७) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. राजेश मोतीलाल पिसे (३४)मृत व्यक्तीचे नाव आहे. (Accident)
माजरी येथील रहिवासी राजेश मोतीलाल पिसे हे पत्नी रोशनीसह आपल्या दोन मुलींसोबत दुचाकीवरुन (MH.34.KY.2661) चंद्रपूरला जात होते. दरम्यान नवीन कोंढा गावाजवळ समोरुन भरधाव येणाऱ्या मारुती कारने (MH.34.BB.0109) पिसे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पिसे हे जागीच ठार झाले. तर पत्नी रोशनी, मुलगी गौरी व अनन्या हे सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबतचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत. (Accident)
हेही वाचा