वनरक्षकाचा मृत्यू 
विदर्भ

चंद्रपूर : राष्ट्रीय महामार्गावर अपघातात वनरक्षकाचा मृत्यू

अनुराधा कोरवी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील वनपरिक्षेत्र खडसंगी (बफर) अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्र बोथली (वहानगाव) येथे कार्यरत असणारे वनरक्षकांचा रविवारी (दि.९) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कर्तव्यावरून दुचाकीने परत येत असताना अपघात झाला. ही घटना चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील वहानगाव येते झाला असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरेश केंद्रे ( वय ३४) असे त्‍यांचे नाव आहे.

वनरक्षक सुरेश केंद्रे हे वनक्षेत्र बोथली (वहानगाव) बिटात रात्री गस्त घालण्यासाठी गेले होते. दरम्यान कर्तव्यावरुन घरी खडसंगीकडे परत येत असताना वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील वहानगावजवळ झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मार्गानी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी घटनेची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना दिली.

किरण धानकुटे तातडीने वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताची माहिती शेगाव पोलीस स्टेशनला दिली. शेगाव पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. यानंतर सुरेश केंद्रे यांचा मृतदेह त्यांच्या मूळगावी नांदेड येथे रवाना करण्यात आला आहे.

हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने की वन्य प्राण्याच्या धडकेने झाला आहे हे अद्याप स्पस्ट झालेले नाही. तपास शेगाव (बु.) पोलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोरते करीत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT