ठाणे :पुणे मार्गावरून धावणाऱ्या जालना आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळे कर्जत लोकलला मोठा थांबा मिळत असल्याने चाकरमान्यांना लेट मार्क लागत आहे. वंदे भारत या गाड्या नॉन स्टॉप धावत असल्याने बाकीच्या गाड्या थांबविल्या जातात. यामुळे या गाड्यांना 15 ते 20 मिनिटांचा लेट मार्क लागत आहे.
कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपासून कर्जत-पनवेल कोस्टल रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. यात रेल्वेरूळांच्या दुरुस्तीचे कामाला गती मिळालेली आहे. परंतु रेल्वे मार्गाच्या कामामुळे कर्जत रेल्वे स्थानकातून अप मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाल्याचे दिसून येतात. प्रामुख्याने हे काम सुरू असल्याने वंदे भारतसारख्या एक्स्प्रेस गाड्या लोकल ट्रॅकवरून धावत असल्याने लोकल गाड्यांना 20 ते 30 मिनिटांचा सिग्नल मिळू लागला आहे.
रेल्वे रुळाच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाकडून कर्जत 3 आणि 4 रेल्वे लाईन बंद करून त्या मार्गावरच्या लोकल सेवांना 1,2,5 आणि 6 रेल्वे मार्गावर वळवण्यात आले असून 5 आणि 6 रेल्वेमार्ग लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रेल्वेसाठी निश्चित केले होते. मात्र अलीकडे 5 आणि 6 रेल्वे मार्गावर देखील लोकल रवाना करण्यात येत आहेत. परिणामी लोकलच्या नियमित होणाऱ्या रहदारीला रेल्वे प्रशासनाकडून मोठा थांबा देण्यात येतो. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्क बसत आहे.
24 ऑक्टोबर, रोजी रेल्वे प्रशासनातर्फे वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेच्या फेऱ्या वाढीचे निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लोकल रेल्वेवर त्याचा आणखी परिणाम झाला आहे. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस फक्त आठवड्यातील सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी धावत होती. मात्र त्यावेळी तीनच दिवस लेट मार्क बसायचा आता एक्स्प्रेस गाड्या वाढल्याने लोकलचा प्रवास आणखी धीमा झाला आहे.
24 ऑक्टोबर, रोजी रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला दर सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील 6 दिवस प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ज्याने कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील 5 आणि 6 रेल्वे लाईन इतर दिवसांत इतर लोकल रेल्वे सेवांकडून वापरली जायची; परंतु रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे आता सोमवार ते शुक्रवार वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेमुळे 5 आणि 6 रेल्वे लाईन व्यस्त राहतील, असे काही प्रवाश्यांचे म्हणणे आहे. तसेच रेल्वे प्रशासनाच्या वंदे भारत एक्स्प्रेस फेरी वाढीच्या निर्णयामुळे आता कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरची लोकल रेल्वे सेवेच्या रहदारीस अडथळा निर्माण होईल. अशी देखील शक्यता काही प्रवाश्यांकडून वर्तवण्यात आली आहे. प्रवाश्यांच्या म्हणण्यानुसार कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावर अगोदरच पनवेल कोस्टल रेल्वे मार्गाचे काम चालू आहे त्यात अधिक भर म्हणून वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचे दिवस वाढविण्यात आले आहेत.
10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत कर्जत रेल्वे मार्गावर कर्जत ते पनवेल कोस्टल रेल्वे लाईनच्या कामासाठी मेगाब्लॉक ठेवण्यात आले होते. परंतु कर्जत ते पनवेल रेल्वे लाईनच्या विस्तारीकरण आणि आभियांत्रिकीकरणांमुळे काम पूर्ण झाले नाही. तसेच कर्जत ते खोपोली रेल्वे मार्ग नेहमी व्यस्त असल्याने तसेच या रेल्वे मार्गावरून भरपूर लोकल आणि इतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस प्रवास करत असतात. त्यांपैकी एक वंदे भारत एक्स्प्रेस असून पुणे आणि नांदेड स्थानकात पोहचण्यासाठी कर्जत रेल्वे मार्ग अतिशय उपयुक्त आहे. दरम्यान अलीकडच्या दिवसांमध्ये कर्जत-खोपोली रेल्वे मार्ग रेल्वे प्रशासनाकडून विस्तारित करत असता. कर्जत, खोपोली, भिवपुरी, नेरळ रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे दिवसेंदिवस प्रवासात हाल होत आहेत.