Thane Voter List Pudhari
ठाणे

Thane Voter List: ठाणे जिल्ह्यात मतदार मॅपिंग मोहिमेला गती

अचूक मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षण; घरपोच पडताळणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मतदार यादीतील दुबार नावे, मृत व स्थलांतरित मतदार तसेच चुकीची माहिती दूर करून यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ‌‘विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम2024‌’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यात मतदार मॅपिंग मोहिम राबवली जात आहे. बीएलओ अधिकारी घरोघरी जाऊन माहिती पडताळत असून नागरिकांच्या सहकार्यावर या मोहिमेचे यश अवलंबून आहे.

या मोहिमेत 2002 मधील जुन्या मतदार यादीची 2024 च्या यादीशी तुलना करून प्रत्येक मतदाराची खातरजमा केली जात आहे. त्यामुळे चुकीची किंवा दुबार नावे काढून टाकणे आणि खरी माहिती नोंदवणे सोपे होणार आहे.

मॅपिंग म्हणजे नेमके काय?

मतदार यादीतील प्रत्येक नावाची जुनी (2002) आणि नवी (2024) यादीशी तुलना करून त्या व्यक्तीची ओळख निश्चित करणे, याला ‌‘मॅपिंग‌’ म्हणतात.

यातून खालील गोष्टी स्पष्ट होतात :

  • एकाच व्यक्तीची दोन नावे आहेत का?

  • मतदार स्थलांतरित झाला आहे का?

  • मतदाराचा मृत्यू झाला आहे का?

  • फोटो किंवा माहिती चुकीची आहे का?

  • नागरिकांनी काय करावे?

  • बीएलओ अधिकारी घरी आल्यावर योग्य माहिती द्यावी.

  • ओळखपत्र, जुनी मतदार माहिती तयार ठेवावी.

  • कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे तपासावीत.

  • नाव मॅपिंग झाले नसेल तर लगेच कळवावे.

  • स्थलांतर, विवाह किंवा नवीन नोंदणी असल्यास माहिती द्यावी.

याचा फायदा काय होणार?

  • मतदार यादी अधिक स्वच्छ आणि अचूक होईल

  • बनावट किंवा दुबार नावे कमी होतील.

  • मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल.

  • प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क मिळेल.

  • कुटुंबाच्या आधारावर मतदारांची साखळी.

18 ते 39 वयोगटातील मतदारांसाठी ‌‘प्रोजेनी मॅपिंग‌’ पद्धत वापरली जात आहे. यामध्ये मुलगा, मुलगी, नात, नातू अशा नव्या पिढीतील मतदारांना त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांशी जोडले जात आहे. यामुळे कुटुंबाच्या आधारावर मतदारांची साखळी तयार होऊन माहिती अधिक अचूक राहण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT