Thane Traffic Diversion Pudhari
ठाणे

Thane Traffic Diversion: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात वाहतुकीत बदल

ठाणे पोलीस आयुक्तालयात आठ क्षेत्रात वाहतूक विभागाची अधिसूचना जारी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ठाण्यात 64 मिरवणुका व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कोर्ट नाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खोपट, कोपरी आनंदनगर, धामणकर नाका, डोंबिवली पूर्व - पश्चिम, कल्याण फाटा, उल्हासनगर गोल मैदान, सुभाष टेकडी भागात मिरवणूका निघणार आहेत.

या मिरवणूका दरम्यान कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. मंगळवारी (ता.14 एप्रिल) सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील. मिरवणुक मार्गावर दोन्ही बाजूकडील रस्त्यावर वाहने उभी (पार्कींग) करण्यास मनाई असुन इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे. असे आवाहन ठाणे शहर वाहतुक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील खोपट येथुन सकाळी संविधान रॅली तर कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आणि कोपरी भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

तसेच, मंगळवारी (ता.14 एप्रिल) सायंकाळी मिरवणूका देखील निघणार आहे. ठाणे स्थानक परिसर, खोपट, कोर्ट नाका, भिवंडी, डोंबिवली, कल्याण भागातून मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून सदर परिसरात वाहतुकीत बदल केले आहेत.

त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे. असे आवाहन वाहतुक विभागामार्फत करण्यातआले आहे. दरम्यान, सदरची अधिसूचना अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. असे वाहतुक विभागाने कळविले आहे.

14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक

ठाणे वाहतुक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचने नुसार, ठाणे शहर जीपीओ येथून कोर्टनाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीओ येथे प्रवेश बंद आहे. येथील वाहने सेंट्रल मैदान, ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्गे, दादोजी कोंडदेव स्टेडियम, अग्निशमन दल, बाजारपेठ ए वन फर्निचर मार्गे वाहतुक करतील. कळवा खाडी पूल येथून येणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेश बंद असेल.

ही वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्गे, जीपीओ मार्गे मार्गक्रमण करतील. सॅटीस पुलावरून टीएमटी बसेस रेल्वे स्थानकाजवळील राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसेसना टॉवर नाका, टेंभीनाका मार्गे प्रवेश बंद असेल. या बसगाड्या गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास मार्गे वाहतुक करतील. टॉवर नाका व टेंभी नाका येथून वाहतुक करणाऱ्या रिक्षा आणि चार चाकी वाहनांना मुस चौक येथे प्रवेशबंदी असेल.

ही वाहने मुस चौकातून डावीकडे वळण घेऊन मार्गक्रमण करतील. कॅडबरी व नौपाड्याकडून डॉ. आंबेडकर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना खोपट येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने खोपटकडून डावीकडे वळण घेऊन कोलबाड, मिनाताई ठाकरे चौकमार्गे मार्गक्रमण करतील. डॉ. आंबेडकर रोडकडुन खोपटच्या दिशेने प्रवेश बंद असुन ही वाहने उथळसर नाका मार्गे इच्छितस्थळी जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT