IPL Betting: आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळवणाऱ्यावर काशिमीरा पोलिसांची कारवाई

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, राहुल अगरवाल याला सट्ट्यासाठीचा हा ऑनलाइन आयडी उत्तम मालू नावाच्या व्यक्तीने पुरवल्याचे समोर आले आहे.
IPL Betting
IPL BettingPudhari
Published on
Updated on

मिरा रोड: इंडियन प्रीमियर लीग मधील क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळवणाऱ्या एका रॅकेटचा काशिमीरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काशिमीरा परिसरातील डी.बी. ओझोन इमारतीत छापा टाकून पोलिसांनी राहुल अगरवाल नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

काशिमीरा परिसरातील डी. बी. ओझोन या इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती 11 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डी.बी. ओझोन सोसायटीमधील बिल्डिंग नं. 28 रूम नंबर 801 मध्ये छापा टाकला असता राहुल बलराम अगरवाल (26) हा तरुण आपल्या मोबाईलवरून एका वेबसाईटच्या माध्यमातून सट्टा खेळत आणि खेळवत असताना मिळून आला.

IPL Betting
Fire Department Recruitment: अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया रखडली; अविनाश जाधव यांच्यासह अर्जदारांची पालिका मुख्यालयावर धडक

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, राहुल अगरवाल याला सट्ट्यासाठीचा हा ऑनलाइन आयडी उत्तम मालू नावाच्या व्यक्तीने पुरवल्याचे समोर आले आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तम मालू यालाही या प्रकरणात आरोपी केले असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल, राऊटर आणि चार्जर व इतर साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल सोनकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमासह इंडियन टेलिग्राफ ॲक्ट च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news