ठाणे

ठाणे : रिक्षाचालकाकडे लाच मागणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई

backup backup

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याणमधील वाहतूक पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथे एक वाहतूक पोलीस चक्क एका रिक्षा चालकाकडे पैशाची मागणी करत आहे. या प्रकरणानंतर कल्याण वाहतूक पोलीस एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी चौकशी करत वरिष्ठाकडे अहवाल पाठवला असून या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कोळसेवाडीचे वाहतूक पोलीस चौकीचे निरीक्षक नवनाथ मिरवणे असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात एका रिक्षा चालकाकडून वाहतूक नियमांचा उल्लंघन झाल्यानंतर त्याच्याकडून रीतसर कायदेशीर पावती करण्याऐवजी मिरवणे हे रिक्षाचा चालकाकडे पैशाची मागणी करत होते. हा रिक्षा चालक शंभर रुपये देत असताना आणखी पैसे वाढवून देण्याची मागणी वाहतूक पोलीस मिरवणे करत होते.

मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला असुन तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणाची कल्याण वाहतूक एसीपी मंदार धर्माधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून संबंधित पोलिसावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. मात्र, याप्रकरणी अजूनही तक्रारदार समोर आले नाहीत.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT