Thackeray Brothers Thane Rally Pudhari
ठाणे

Thackeray Brothers Thane Rally: महामुंबई गुजरातला देण्याचा घाट; ठाकरे बंधूंचा राज्य सरकारवर घणाघात

मराठी शहरे वाचवा, महायुतीला महापालिकेतून हद्दपार करा – ठाण्यात उद्धव-राज ठाकरे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर रायगडची महत्वाची मराठी शहरे गुजरातला देण्याचा घाट या सरकारने घातला असून यासाठी अदानीला एजंट नेमले आहे. असा जोरदार हल्ला उद्धव आणि राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत केला. तुमची मराठी शहरे वाचवा आणि महापालिकेमधून या महायुतीला हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाणे गडकरी रंगायतनच्या समोर ठाकरे बंधुच्या शिवशक्तीची जाहीर प्रचार सभा झाली. याप्रचार सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी खासदार राजन विचारे, संजय राऊत, अविनाश जाधव, केदार दिघे आदी नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले, मराठी माणसाला जागे करण्यासाठी आमची हि युती आहे. आम्ही एका घरची लेकरे आहोत. आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस सुद्धा एकाच आईचे लेकरू आहेत. ही आमची मायमराठी आहे. याच मराठीवर हे घाला घालत आहेत. पण आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे आहोत. आमच्या घरात घुसून आम्हाला कुणी दादागिरी करणार असेल तर त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय राहणार नाही. राजकर्त्यांची नितीही मायमरो आणि मावशी जगो अशी यांची निती आहे. म्हणूनच हे म्हणतात हिंदी आमची मावशी आम्हाला आमची माय मराठी हवी आहे. तिला मारायला निघालेल्यांना धडा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची मराठी जगवा आणि मग मावशी, काकी कुणाला वाचवायचे ते वाचवा.

आज महाराष्ट्रमध्ये लाखो बेकारांची फौज तयार होत आहे. इथे बेकारी वाढून इथल्या तरुणांना मुंबई आणि महामुंबईतून हद्दपार करून यांना गुजरातला ही शहर विकायची आहेत. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली तेच आता ठाण्याशी गद्दारी करत हे शहर विकत आहेत.

इथली जंगल विकत आहेत. मला कळकळीने विनंत करायची आहे. तुम्हाला लोकांना विकत घेऊन सत्ता हवी आहे. आणि हा प्रदेशही विकायचा आहे. कानशिलात वाजवल्याशिवाय राहणार नाही. राजकर्त्यांची नितीही मायमरो आणि मावशी जगो अशी यांची निती आहे. म्हणूनच हे म्हणतात हिंदी आमची मावशी आम्हाला आमची माय मराठी हवी आहे. तिला मारायला निघालेल्यांना धडा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची मराठी जगवा आणि मग मावशी, काकी कुणाला वाचवायचे ते वाचवा.

आज महाराष्ट्रमध्ये लाखो बेकारांची फौज तयार होत आहे. इथे बेकारी वाढून इथल्या तरुणांना मुंबई आणि महामुंबईतून हद्दपार करून यांना गुजरातला ही शहर विकायची आहेत. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली तेच आता ठाण्याशी गद्दारी करत हे शहर विकत आहेत. इथली जंगल विकत आहेत. मला कळकळीने विनंत करायची आहे. तुम्हाला लोकांना विकत घेऊन सत्ता हवी आहे. आणि हा प्रदेशही विकायचा आहे. ही गद्दारी ही कधीही सहन होणारी नाही. गणेश नाईकांनी बिबटे दिसतील तिथे शुट आणि साईटचे आदेश दिले होते. पण बिबट्यांच्या जंगलात घुसणाऱ्या गद्दारांना शुट एन्ड साईट कधी करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई ठाण्यावर अपार प्रेम होते. त्यांनी मराठी माणसांसाठी लढा दिला तोच विचार या निवडणुकीत तुम्ही घराघरपर्यंत न्या आणि गद्दारांना या भुमीत गाडा आणि मराठी माणसाच राज्य आणा असे आवाहन त्यांनी केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी पुढे बोलताना कोट्यावधी रुपये वाटून प्रसंगी लोकांचे खुन करून आणि प्रत्येक मताला पाच हजार रुपये रेट देवून हे राज्यकर्ते निवडणूका जिंकु पाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावी, म्हणून कोट्यावधीच्य्ाा ऑफर दिल्या. शैलेश धात्रक कुटुंबियांना 15 कोटींची ऑफर दिली. राजश्री नाईक यांना 5 कोटीची ऑफर दिली. सुशील वावरे यांना एक कोटीची ऑफर दिली. या स्वाभिमानी नगरसेवकांनी या ऑफर नाकारल्या आणि लढाई लढली. या राजकर्त्यांना माझा प्रश्न आहे. हे पैसे आणता कुठून, तुमच्याकडे टाकसाळ आहे का. ही निवडणूक कशाची निवडणूक आहे. कशाची लाजबिज न ठेवता तुम्ही सारे काही करता. बदलापूरात आरोपीचा एनकाऊंटर झाला. आपटे नावाच्या सहआरोपीला स्विकृत नगरसेवक केला.

आमच्या आंदोलनामुळे त्यांनी राजीनामा दिला. महिला भगिंनीची लाज लुटणारे तुम्हाला प्रिय आहेत. मुंबईशी महाराष्ट्राचा संबध नाही, असे म्हणणारे तुम्हाला प्रिय आहेत. खोटे बोला आणि रेटून बोला, असा तुमचा कारभार आहे. सगळ्या संयमाच्या सिमारेषा गुंडाळून ठेवून मुक्तपणे आणि बेफिकरपणे जे वाटेल ते तुम्ही करता लोकांना दम देता, लोकांना पैसे देता, प्रसंगी एबी फोर्म गिळून टाकता. आमच्या माणसाचा खुन करता आणि पोलीस हताश, कोर्ट हताश लोकांनी करायचे काय असा सवाला राज ठाकरे यांनी विचारला. हे सरकार म्हणजे तुमच्या डोक्यावर बसलेलेे ससाणे आहेत. स्वकियांचा घात आणि परकियांना महाराष्ट्र आंदण द्यायची ही तुमची निती आहे. अदानी हे काय प्रकरण आहे. आता अदानींकडे बंदरे दिलात, विमानतळ दिलात, एका विमान कंपनीने संपुर्ण हवाई वाहतूक बंद केली आणि देशाला वेठीस धरले. कारण 65 टक्के विमानसेवा तुम्ही एका कंपनीकडे दिलात. असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT