North Mumbai BMC election: उत्तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू थेट सामना; परप्रांतीय वाढीमुळे राजकीय गणिते बदलणार

मराठी मतांवर उद्धव सेना-मनसेची मदार, भाजप-शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद निर्णायक ठरणार
North Mumbai BMC election
North Mumbai BMC electionPudhari
Published on
Updated on

मुंबई : राजन शेलार

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच भाजपला साथ दिली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत येथील मतदारांनी शिवसेनेलाही तितकीच साथ दिली आहे. तथापि, शिवसेनेत पडलेली फूट, भाजपची वाढलेली ताकद, उत्तर मुंबईत परप्रांतीयांची वाढलेली संख्या यामुळे निवडणुकीची समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत उद्धव सेना आणि मनसेची पूर्ण मदार मराठी मतदारांवर अवलंबून असली तरी उत्तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंचा थेट सामना होणार हे निश्चित.

North Mumbai BMC election
Navi Mumbai International Airport: चौथ्या मुंबईत तिसरे विमानतळ उभारणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकीय सत्तासंघर्षांतील बंडाळीनंतर प्रथमच महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा दहिसर ते मालाडपर्यंत पसरलेला आहे. या मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, चारकोप आणि कांदिवली या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मागाठाणे येथे शिंदे सेना व मालाड पश्चिम येथे काँग्रेसचा आमदार आहे. ठाकरे किंवा मनसेचा एकही आमदार येथे नाही. बोरिवली पश्चिम, कांदिवली पश्चिम, मालाड परिसरात गुजराती, जैन मारवाडी यांचे मोठे प्राबल्य आहे. तर दहिसर, मागाठाणे, बोरिवली पूर्व, कांदिवली पूर्व भागात मराठी, दलित आणि उत्तर भारतीय मतदारांचे वर्चस्व आहे.

North Mumbai BMC election
Railway Accident Compensation: प्लॅटफॉर्म तिकीटधारकालाही रेल्वे अपघातात नुकसानभरपाईचा हक्क – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

शिवसेनेतील बंडाळीपूर्वी येथे म्हणजे 2017 च्या पालिका निवडणुकीत उत्तर मुंबईतून शिवसेनेचे 18 हून अधिक तर भाजपचे 23 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले होते. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर येथील बहुतांश नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूच्या एकजुटीमुळे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. हे पाहता ठाकरे बंधूंच्या जागावाटपात उद्धव सेना 31 जागांवर, तर मनसे 10 जागांवर लढत आहे. त्याचबरोबर महायुती म्हणून भाजप 27 जागांवर तर शिंदे सेना 11 जागांवर उभी ठाकली आहे.

North Mumbai BMC election
Devendra Fadnavis Matoshree Statement: आता मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हृदयाचे दरवाजे उघडे; अण्णामलाईंच्या वक्तव्यावरही स्पष्ट भूमिका

मुंबईत उद्धव सेनेतील आदित्य ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळाली आहे. दहिसरमध्ये भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांच्यासाठी एकप्रकारे कसोटी ठरणार आहे.

उद्धव सेनेचे माजी आमदार, उपनेते विनोद घोसाळकर यांची सून तेजस्विनी घोसाळकर या भाजपमध्ये गेल्याने प्रभाग क्रमांक 2 मधून युवा सेनेची कार्यकर्ती धनश्री कोलगे हिला उमेदवारी मिळाली आहे.

North Mumbai BMC election
Mahayuti Shivaji Park Rally: शिवतीर्थावर महायुतीच्या सभेत हिंदुत्वाचा गजर; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण भारले

कांदिवली भागात तिरंगी लढत होण्याची शक्यता

कांदिवलीत शिंदे सेना, काँग्रेस, उद्धव सेना युती अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र, येथे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना येथील मतदारांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. कांदिवली पश्चिममध्ये मराठी बरोबरच गुजराती आणि उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरली आहेत. येथील मराठी भाषिक हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी राहिला आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विभागलेल्या मतांचा कोणावर परिणाम होतो, हे अवघ्या काही दिवसांत दिसून येणार आहे. मालाड पश्चिम हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news