Mobile Theft Pudhari
ठाणे

Mobile Theft: मार्च महिन्यात रेल्वेतील मोबाईल चोरीचा आकडा शंभरी पार

मोबाईल चोरट्यांचे ठाणे लोहमार्ग पोलिसांना आव्हान

पुढारी वृत्तसेवा

सुरेश साळवे

ठाणे: मार्च महिन्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांची संख्या शंभरी पार झाल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रवासातील मोबाईल चोरी, रोकड चोरी आणि हाणामारीसारख्या घटना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दाखल गुन्ह्यावरून दिसत आहे.

रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरटे यांनी धुमाकूळ घातलेला असून मार्च महिन्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांची संख्या शंभरी पार झाल्याचे चित्र आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आणि विविध प्लॅटफॉर्म त्याच बरोबर गर्दीच्या रेल्वे लोकल यामध्ये दबा धरून बसलेले चोरटे हे लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महागडे मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढीस लागलेले आहेत.

तर दुसरीकडे रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना चोरटे प्रवाशांचे मोबाईल चोरण्याचा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांना चोऱ्यांचे आव्हान ठरत आहे. एका महिन्यात शंभरी पार मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी दाखल केलेल्या आहेत. त्यासोबतच रोकड असलेल्या सॅक बॅगांवरही हातसफाई करण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

रेल्वे पोलीस करताहेत तारेवरची कसरत

गर्दीचा फायदा घेऊन पोलीस रेकॉर्डवर नसलेल्या आरोपींद्वारे करण्यात येणाऱ्या चोऱ्यांप्रकरणी अज्ञात चोरट्यांचा तपस करणे म्हणजे आंध्रात चाचपण्यासारखा प्रकार आहे. केवळ स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही हाच एकमेव संशयित आरोपी शोधून त्यांच्या माहिती काढीत आरोपींपर्यंत पोहचणे ही तारेवरची कसरत ठरत आहे.

मात्र गर्दीच्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांतून चोरट्याला हेरणे आणि शोधणे हे कडवे आवाहन आहे. मात्र ठाणे रेल्वे पोलिसांनी मात्र या आव्हानाला पेलवत अनेक मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलेले आहे.

मोबाईल चोरट्यांच्या मार्च महिन्यातील ठळक घटना

  • अवघ्या 48 तासांत मोबाईल चोरीच्या नऊ गुन्ह्यांची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी दाखल केल्या. 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या दहा मोबाईलची चोरी यामध्ये एका शिक्षिकेसह एका वकिलाच्या मोबाईलचा समावेश आहे.

  • धावत्या लोकलमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चक्क प्रवाशाच्या खिशात ठेवलेल्या1 लाख रुपयांच्या रोकडीवर डल्ला मारल्याची घटना 8 मार्च रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

  • 12 मार्च, 10 मार्च रोजी सकाळी सुमारे 8.31 वाजता दिवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या स्लो लोकलमध्ये प्रवासी चढत होते. गर्दीत चढल्यानंतर त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेले एक लाख 2 हजार 999 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरीला गेले.

  • 23 मार्च रोजी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या पाच मोबाईल चोरीच्या तक्रारींमध्ये प्रवाशांचे तब्बल सव्वा दोन लाखाचे मोबाईल घेऊन आज्ञात चोरटे परागंदा झाले.

  • 25 मार्च रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वा. ठाणे रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशी यांना प्रवासादरम्यान डुलकी लागताच त्यांच्या सॅकमधील 1 लाख 76 हजार रुपयांची रोकड गायब झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT