ठाणे

ठाणे: मनोरुग्ण मुलाचा सुरीने हल्ला; आईचा मृत्यू,वडील गंभीर जखमी

अविनाश सुतार

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : मानसिक रुग्ण असलेल्या 31 वर्षीय मुलाने आपल्याच वृद्ध आई वडिलांवर कांदा कापण्याच्या सुरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी घोडबंदर रोडवरील विहंग हिल्स येथे घडली. या हल्ल्यात 66 वर्षीय महिला विनिता विलास भाटकर यांचा मृत्यू झाला. तर वडील विलास भाटकर ( वय 71) गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मनोरुग्ण मुलगा फरार झाला. मात्र त्यास अवघ्या काही तासातच पोलिसांनी मुंबईतून अटक केली. संकल्प भाटकर (वय 31, कोपरी, ठाणे) असे अटक केलेल्या मनोरुग्ण मुलाचे नाव आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विहंग हिल्सच्या फेज टू मध्ये राहणारे विनिता व विलास भाटकर या वृद्ध दाम्पत्याचे त्यांचा कोपरी येथे राहणारा मुलगा संकल्प याच्या सोबत दोन आठवड्यांपूर्वी घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या रागातून संकल्पने गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास विहंग हिल्स मधील आपल्या आईवडिलांचे घर गाठले. यावेळी त्याने घरात घुसून आपल्याच आई वडिलांवर कांदा कापण्याच्या सुरीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आई वनिता हिच्या पोटावर गंभीर वार झाल्याने तिचा मृत्यू झाला.

तर वडील विलास यांच्या मानेवर व इतर ठिकाणी वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घोडबंदर रोडवरील टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी संकल्प आपल्या मोटारसायकलवरून फरार झाला. मात्र कासार वडवली पोलिसांनी दोन पथक तयार करून त्याचा शोध सुरू केला व त्यास अवघ्या काही तासातच कुर्ला, मुंबई येथून अटक केली. आरोपी हा स्टेरॉईड नावाचे अंमली पदार्थाचे सेवन करीत असून तो मनोरुग्ण आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT