Railway Track Safety
सापाड : मुंब्रा स्टेशनवर झालेल्या अपघातात ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आणि ९ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कळवा-मुंब्रा येथील विविध रुग्णालय उपचार सुरू आहे. मात्र या अपघातात अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून अपघात रेल्वे प्राणसनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे घडल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. तर मुंब्रा-कळवा खाडीतून अनधिकृत रेती उत्खनन होत असून रेती उत्खननासाठी ब्लास्ट केल्यामुळे रेल्वे ट्रॅक खालील माती भुसबभुशीत झाली असून रेल्वे ट्रॅक एका बाजूने झुकल्याचे दिसून येत असल्याचा दावा स्थानिक रहिवाशी गणेश नीलकंठ पाटील यांनी केला आहे. मुंब्रा स्थानकादरम्यान अपघातानंतर रेल्वे प्रवासी महेश नीलकंठ पाटील यांनी रेल्वे अपघाताबाबद खळबळजनक आरोप केला आहे की, मुंब्रा-दिवा खाडीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रेती उत्खनन होत आहे.
रेती उत्खनन करताना ब्लास्टिंग केली जात आहे. या ब्लास्टिंगमुळे रेल्वे ट्रैकला धोका निर्माण झाला असून रेल्वे ट्रॅक खालील अजमीन भुसभुशीत झाली आहे, त्यामुळे रेल्वे ट्रैक एका बाजूने खचला आहे. खचलेल्या रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे वेगाने धावत असताना रेल्वे एका बाजूला झुकली जाते आणि झुकलेल्या बाजूने प्रवाशांचा तोल जाऊन प्रवासी रेल्वेतून खाली पडत असल्याचा खळबळजनक दावा महेश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक वाचवून रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे. या रेती माफियांवर कारवाईच्या मागणीसाठी महसूल खात्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या, मात्र महसूल खात्याच्या उदासीनतेमुळे माफियांवर कारवाई होत नाही.
त्यामुळे रेतीमाफीयांचे चांगलंच फावलं आणि अनाधिकृत रेती उत्खननाला रेती माफियांकडून जोर वाढू लागल्याच्या घटनांना उधाण आले. तर गणेश नीलकंठ पाटील यांनी या संपूर्ण अनाधिकृत रेती उत्खननाविरोधात तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकाच्यांकडे पत्रव्यवहार केले आहेत. मात्र शासकीय यंत्रणांनी या रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची शोकांतिका आहे. तर महसूल खात्याच्या दुर्लक्षामुळे होत असलेली अनधिकृत रेती उत्खननामुळेच रेल्वे ट्रॅकर खालील माती भुसभुशीत झाल्याचा दावा करत हायकोर्टात गणेश नीलकंठ पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.
हायकोर्टाने देखील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने गांभीर्य दाखवणे गरजेचे असून रेती माफियांवर कारवाईचे आदेश काढले आहेत. मात्र या रेतीमाफीयांवर हायकोर्टाच्या आदेशानंतर देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
दिवा मुंब्रा खाडीतून अनाधिकृत रेती उत्खनना विरोधात महसूल खात्याच्या तहसीलदार प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करून रेतीमाफीयांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र महसूल खात्याकडून रेती माफीयांवर कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्यामुळे मी हायकोर्टात धाव घेत याचीका दाखल केली आहे. याचिका दाखल केल्यानंतरहायकोर्टाने कारवाईसाठी आदेश देऊन देखील प्रशासन रेती माफीयांवर उधार का? त्यामुळे आता या रेतीमाफीयांवर कारवाई होईल की लाखो प्रवाशांचा जीवावर टांगती तलवार लागेल.गणेश नीलकंठ पाटील, याचिकाकर्ते