ठाणे

Thane SSC Result: ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल 93.63 टक्के

अविनाश सुतार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल (Thane SSC Result) आज (दि. २) जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा 93.63 टक्के लागला. जिल्ह्यातून यंदा 1 लाख 11 हजार 182 विद्यार्थी या परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1 लाख 4 हजार 102 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 32 हजार 382 विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण्य मिळवले आहे. यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात 3.5 टक्क्यांनी घट झाली आहे.

जिल्ह्याच्या निकालात यंदाही मुलींनीच सरशी दिसून (Thane SSC Result) आली आहे. ठाणे जिल्ह्यातून 53 हजार 843 मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 51 हजार 349 मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.38 टक्के इतके आहे. तर जिल्ह्यातील 57 हजार 339 मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 743 मुले परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.98 टक्के इतके आहे.

ठाणे जिल्ह्यातील 32 हजार 382 विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविले आहे. तर 37 हजार 212 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 26 हजार 186 एवढी असून, एकूण 1 लाख 41 हजार 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT