ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत विचारे यांनी शनिवारी ठाणे शहराचा दौरा केला. Rajan Vichare  (Pudhari Photo)
ठाणे

Thane News | ठाणे बनले तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे, डबक्यांचे शहर

Thane Municipal Corporation | राजन विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले

पुढारी वृत्तसेवा

Thane Garbage issue

ठाणे : ठाणे तलावांचे शहर नाव बदलून कचऱ्याचे आणि डबक्यांचे शहर असे नामकरण करा, असा टोला शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना लगावला. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत विचारे यांनी शनिवारी ठाणे शहराचा दौरा केला. यावेळी नाले, रस्ते, तलावांची दुरवस्था पाहून विचारे यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व तलावांच्या दुरवस्थेबाबत विचारे यांनी बुधवारी पोलखोल केली. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात मासुंदा तलाव येथून केली. यामध्ये तलावाच्या आउटलेटची कामे निधीअभावी अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पावसाचे पाणी बाजारपेठत जाऊन दरवर्षी व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली. तसेच वंदना डेपो येथील नाला कचऱ्याने भरलेला दाखवत ठेकेदार कशी हात की सफाई करतो याचे उदाहरण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दाखवून दिले.

या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, भगवान शिंदे, वैभव तपकिरी, चंद्रकांत सावंत व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा

यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी सिद्धेश्वर तलाव परिसरातील रूपादेवी पाडा येथील नाल्यातील साठलेला कचरा निदर्शनास आणून देऊन ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले, लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांचे प्रशासनावरील अंकुश सुटल्याने मनाप्रमाणे कामे करीत आहेत. सिद्धेश्वर तलावात यापूर्वी अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. त्यावेळी अधिकाऱ्यांनाही कामे वेळेत पूर्ण करा, नाहीतर आंदोलन उभे करावे लागेल, असा थेट इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT