

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात गुरूवारी (दि.22) रोजी रात्रीच्या सुमारास फॉल सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेच्या
फॉल सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.24) सकाळी पाहणी केली. सदर फॉल सिलिंगच्या दुरूस्तीकरिता नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुरूस्ती होईपर्यंत रंगकर्मींसह नाट्य रसिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उपक्रमातील डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले कलामंदिरातील फॉल सिलींगचा भाग गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक कोसळला सुदैवाने नाट्यगृहात कोणताही कार्यक्रम वा नाट्यप्रयोग सुरू नव्हता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा प्रकार समजल्यानंतर केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियरला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सावित्रीबाई फुले कलामंदिर हे नाट्यगृह सुरू होऊन अठरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. स्ट्रक्चरल इंजिनियरच्या मतानुसार फॉल्स सिलिंगचे फ्रेमिंग गंजलेले आणि कमकुवत झाल्यामुळे नव्याने करणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले कलामंदिराची तातडीने दुरूस्ती करण्यासाठी सद्यस्थितीत सदर नाट्यगृह काही काळ बंद ठेवण्याकरिता महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मंजुरी दिली आहे. होणाऱ्या गैरसोयीबाबत रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.