ठाणे : धावत्या चारचाकी कारने अचानक ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ रस्त्यावर अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री समोर आली. यावेळी कारमध्ये तीन जण होते. ते वेळी कारमधून बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले असून त्या कारचे नुकसान झाले आहे. यावेळी त्या परिसरात वाहतूक कोंडीसह काही वेळ गोंधळ झाला होता.
शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील रस्त्यावरून एक कार धावत होती. हेरंब सोनावणे यांच्या मालकीच्या त्या कारने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.
तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान आग लागली त्यावेळी कारमधून तीन जण प्रवास करत होते. ते आग लागताच सुखरूप कारमधून बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. मात्र या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी एक फायर वाहन पाचारण करण्यात आले होते.अशी आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.