ठाणे

ठाणे : सिन्नर येथे झालेल्या अपघातात कल्याणच्या उमद्या खेळाडूचा मृत्यू

backup backup

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान आचार्य : शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कल्याणच्या एका सतरा वर्षीय खेळाडू असलेल्या तरुणीचा देखील मृत्यू झाल्याने कल्याण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीक्षा गोंधळी असे या तरुणीचे नाव असून ती मॉडेल महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत होती. दीक्षाला खेळाची प्रचंड आवड होती. इतकेच नव्हे तर कबड्डी आणि शॉर्ट बॉल्समध्ये तिने अनेक बक्षिसे देखील पटकावली आहेत. एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कल्याण शहरावर शोककळा पसरली आहे.

दीक्षा, तिची आई आणि वडील हे तिघेही देवदर्शनासाठी कल्याणहून अंबरनाथकडे रवाना झाले. त्यांनतर अंबरनाथ येथून शिर्डी येथे जाण्यासाठी त्यांची बस निघाली. मात्र, काळाने अचानक घाला घातल्याने बस आणि ट्रकची टक्कर झाली. या अपघातात दीक्षा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT