डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली जीमखाना परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या घरातून 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत चोरीचा प्रकार घडला असून या संदर्भात एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
स्वाती पुष्कर आपटे (वय 32) असे तक्रारदार शिक्षिकेचे नाव आहे. त्या डोंबिवली जीमखाना रोडला असलेल्या सांगर्लीतील तारांगण सोसायटीत राहतात. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आपटे यांच्या घरातून 52 ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या 2 लाख 80 हजार रूपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. एमआयडीसीच्या निवासी विभागातील संध्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दागिने चोरल्याचा संशय शिक्षिका आपटे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने संमतीशिवाय लबाडीने सोन्याचा ऐवज चोरून नेल्याचा तक्रारदार शिक्षिका आपटे यांचा आरोप आहे. या प्रकरणी फौजदार आर. वाय. चौगुले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा