Tarapur Gas Leak Pudhari
ठाणे

Tarapur Gas Leak: तारापूर MIDC मध्ये वायुगळती; १८ कामगारांना वायूबाधा

डीएमएस रसायन टँकरमध्ये भरताना गळती; कंपनीवर माहिती दडपल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : संदीप जाधव

तारापूर औद्योगिक वसाहतीतील आरती फार्मालॅब्स लिमिटेड येथे रविवारी दुपारी वायुगळतीची घटना घडून १८ कामगारांना वायूबाधा झाल्याने खळबळ उडाली. बाधित कामगारांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास डाय मिथाईल सल्फेट हे द्रवरूप रसायन टँकरमध्ये भरताना गळती झाली. या रसायनाचा हवेशी संपर्क होताच वायू पसरला. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित कामगारांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांत जळजळ, चुरचुर, उलटी व मळमळ अशा तक्रारी जाणवू लागल्या.

बाधित कामगारांना तातडीने अधिकारी लाईफ लाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

दरम्यान, घटनेची माहिती कंपनीकडून उशिरा देण्यात आल्याचा आरोप होत असून प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेची नोंद बोईसर पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT